CERTIFICATE COURSE IN VMC PROGRAMMING AND OPERATING

 

(कालावधी सहा महिने, नोकरी अथवा व्यवसायातुन मिळणारे अंदाजे उत्पन्न  १०००० ते 5०००० )

   सध्याच्या ऑटोमेशनच्या युगात कमी वेळेत ,कमी कष्टामध्ये काम होण्यासाठी इंडस्ट्रीमध्ये पारंपारीक लेथ व मिलिंग मशीन्सच्या जागेवर आधुनिक सी.एन.सी मशीन्सचा वापर मोठया प्रमाणात होत आहे.सी.एन.सी म्हणजे कॉम्प्युटराईज्ड न्युमरीकल कंट्रोल या मशीन्स कॉम्प्युटरदवारे त्यांना दिलेल्या प्रोग्रामनुसार (सुचनांनुसार) नियंत्रित होतात.सी.एन.सी मशीनवर काम करणे एक प्रकारचे स्मार्ट वर्क आहे.सध्याच्या काळात सर्वात जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध असणारे क्षेत्र म्हणून सी.एन.सी कडे पाहिले जाते.याच क्षेत्रामधील कुशल मनुष्यबळाची कमतरता भरूण काढण्यासाठी व जास्तीत जास्त युवकांना रोजगार मिळवुन देण्याच्या हेतुने संस्थेने सी.एन.सी हा कोर्स सुरू केला आहे.

         सी.एन.सी ऑपरेटिंग व प्रोग्रामिंगचे दर्जेदार प्रशिक्षण देण्यासाठी संस्थेने संस्थेमध्येच सी.एन.सी लेथ व व्हि.एम.सी मशीन उपलब्ध केली आहे.या मशीन्सवर विद्यार्थ्यांकडुन जास्तीत जास्त प्रात्यक्षिके करूण घेतली जातात.याबरोबरच ऑडिओ व्हिज्युअल ट्रेनिंगच्या सहाय्याने प्रत्येक विषय समजावुन सांगितला जातो.

         सी.एन.सी वर कामाचा अनुभव मिळावा म्हणुन संस्थेने अनेक कंपन्यांशी ऑन जॉब ट्रेनिंगसाठी करार केलेला आहे.या माध्यमातुन विद्यार्थ्यांना शिकत शिकत काम करण्याची व पैसे कमविण्याची संधी मिळत आहे.      हा कोर्स अनेक युवकांसाठी वरदान ठरलेला असुन युवकांसाठी हा कोर्स अल्पावधीत म्हणजेच फकत एक महिण्याच्या प्रशिक्षणामध्ये रोजगार मिळवुन देणारा कोर्स आहे. प्रत्येक महिण्याला या कोर्सची एक नवीन बॅच सुरू होते.एका बॅचमध्ये जास्तीत जास्त आठ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. प्रत्यक्ष मशीनवर ट्रेनिंग दिले जाते.हा कोर्स पुर्ण झाल्यानंतर उमेदवार आत्मविश्वासाने व्हि.एम.सी मशीन ऑपरेट व प्रोग्राम करू शकतो