CONSTRUCTION SUPERVISOR
कन्स्ट्रकशन सुपरवायजर
- कन्स्ट्रकशन सुपरवायजर हा कोर्स 1 वर्ष कालावधीचा आहे.
- हा कोर्स पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र शासन (महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ) यांचे प्रमाणपत्र दिले जाते.
- या अभ्यासक्रमामध्ये
1)construction material and practices (TH)
2)Estimating and costing (TH)
3)Surveying and leveling (TH)
4)Construction practices (PR)
5)Surveying and leveling (PR)
असे पाच विषयांचे प्रशिक्षण दिले जाते.
- यानंतर आपण कन्स्ट्रकशन सुपरवायजर हा कोर्स केल्यानंतर होणारे फायदे व करीयरच्या संधी याबद्दल माहिती घेऊया.
कन्स्ट्रकशन सुपरवायजर म्हणजेच बांधकाम पर्यवेक्षक हा कोर्स शासकीय/खाजगी नोकरीसाठी तसेच बांधकाम व्यवसाय सुरू करण्यासाठी अत्यंत उपयुक्त कोर्स आहे.
हा कोर्स पूर्ण केल्यानंतर उमेदवार जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग(PWD), जलसंपदा, जलसंधारण, पाटबंधारे , म्हाडा , महानगरपालिका , राज्य रस्ते विकास महामंडळ इत्यादि शासकीय तसेच अनेक खाजगी कन्स्ट्रकशन कंपन्यांमध्ये site supervisor म्हणून काम करू शकतो.
या कोर्सचा आणखी एक महत्वाचा फायदा म्हणजे कोर्स पूर्ण केल्यानंतर उमेदवार गव्हर्नमेंट कॉंट्रॅक्ट लायसन्स काढू शकतो व शासकीय कामे घेऊन स्वयंरोजगार मिळवू शकतो.
- हा कोर्स करण्याची पात्रता काय आहे किंवा हा कोर्स करू शकते.
हा कोर्स करण्यासाठी कमीत कमी 10 वी पास शिक्षण आवश्यक आहे.तसेच 12 वी, ग्रॅजुएट व सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणारे ज्यांना स्वतःच व्यवसाय सुरू करून स्वावलंबी बनायचे आहे असे उमेदवार हा कोर्स करू शकतात.
- हा कोर्स करण्यासाठी योग्य संस्थेची निवड कशी कराल.
- सर्वप्रथम संस्था महाराष्ट्र शासन (महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मान्यताप्राप्त)असणे गरजेचे आहे.
- संस्थेमध्ये या प्रशिक्षणासाठी आवश्यक यंत्रसामुग्री व साहित्य साधने आहेत का? हे पहावे.
- प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षित व अनुभवी प्रशिक्षक वर्ग आहे का?
- सध्याच्या काळात तंत्रज्ञानामुळे डिजिटल शिक्षण पद्धतीचा वापर केला जातो का?
- प्रशिक्षणाबरोबरच संस्थेमध्ये विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास,रोजगार व स्वयंरोजगारासाठी कोणकोणते उपक्रम राबविले जातात?
या सर्व बाबींचा विचार करून उमेदवाराने संस्थेमध्ये प्रवेश घेणे आवश्यक आहे.
तरी या कोर्सबद्दल अधिक माहिती साथी तुम्ही 9545672112 या नंबरवर संपर्क करू शकता.
