AUTO ENGINEERING TECHNICIAN
(कालावधी २ वर्ष )
दहावी आणि बारावी झाल्यानंतर अनेक युवकांना प्रश्न पडतो की पुढे काय करायचं? अनेकांना दहावीनंतर आर्ट्स,कॉमर्स आणि सायन्सला प्रवेश घेणे एवढच माहीत असतं यामध्ये बारावी पूर्ण झाल्यानंतर पुन्हा प्रश्न पडतो पुढे काय करायचं यामध्ये काही मुले graduation करतात तर काही वेगळ्या क्षेत्रामध्ये करियर चा पर्याय निवडतात.परंतु सध्याचा काळ टेक्निकल कौशल्य मिळवून रोजगार अथवा व्यवसाय करण्याचा आहे.याचा फायदा असा होतो कमी कालावधीमध्ये आपण हे शिक्षण पूर्ण करून प्रत्यक्ष काम करण्यास सुरुवात करतो व यशस्वी होतो.हे शिक्षण झाल्यानंतर तूम्हाला पुढे काय करायचं हा प्रश्न पडणार नाही तर तुम्हाला क्लिअर माहिती असेल की काय करायचं आहे.
आज आपण अशाच एका क्षेत्राबद्दल व कोर्सबद्दल माहिती घेणार आहे ते म्हणजे automobile sector तुम्ही पाहतच असाल की, हे क्षेत्र किती विस्तारीत आहे.अगदी सेकंदाला रस्त्यावरून गाड्या धावताहेत यामध्ये टू व्हीलर्स, कार्स, ट्रान्सपोर्ट वेहिकल्स, टुरिस्ट वेहिकल्स इत्यादि.पूर्वी प्रत्येकाच्या घरी गाडी नव्हती परंतु सध्या प्रत्येकाच्या घरी गाडी आपणास पहायला मिळते एवढच काय घरातल्या प्रत्येकाकडे गाडी पहायला मिळते.एवढे गाड्यांचे प्रमाण आणि महत्व वाढले आहे.
तर मग याच्यातच तुम्हाला संधि दिसत नाही का? ऑटोमोबाईल manufacturing इंडस्ट्री मध्ये जॉबच्या मोठ्या संधि आहेत.त्याचबरोबर गाड्यांची व स्पेअर पार्ट्स विक्री तसेच सर्विसिंग यामध्ये व्यवसायाच्या मोठ्या संधि आहेत.यामध्ये तुम्ही लाखो रुपये कमवू शकता.
चला तर पाहूया या क्षेत्रामध्ये करियर करण्यासाठी आपण कोणता कोर्स करू शकतो.यामध्ये तुमच्याकडे दोन पर्याय असतील एक म्हणजे डिझेल मेकॅनिक आणि दूसरा ऑटो इंजिनिअरिंग टेक्निशियन.डिझेल मेकॅनिक या एक वर्षाच्या कोर्सबद्दल आपण अगोदर माहिती बघितलेली आहे.आज आपण पाहणार आहे ऑटो इंजिनिअरिंग टेक्निशियन या कोर्सबद्दल माहिती.
ऑटो इंजिनिअरिंग टेक्निशियन हा कोर्स महाराष्ट्र शासनाचा आहे.
या कोर्सचा कालावधी हा दोन वर्षाचा असतो.
1)कोर्स पूर्ण झाल्यानंतर उमेदवार apprentice act नुसार apprentice करू शकतो.
2)उमेदवार ऑटोमोबाइल इंडस्ट्री मध्ये काम करू शकतो तसेच स्वतःचा व्यवसाय करू शकतो.यामध्ये सर्विसिंग सेंटर,स्पेयर पार्ट्स विक्री,व्हील अलायनमेंट व बॅलन्सिंग,ऑटोमोबाइल डायग्नोसिस इत्यादि प्रकारचे व्यवसाय करू शकतो.
3) ज्या उमेदवारांनी दहावीनंतर या ट्रेडला प्रवेश घेतला आहे त्यांची हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर बारावी देखील पूर्ण होते उमेदवार पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेऊ शकतो.
4) शासन निर्णयानुसार या कोर्सला iti बरोबरच पदविका म्हणजेच डिप्लोमा अभ्यासक्रम म्हणून मान्यता मिळाली आहे.
या कोर्समध्ये खालील विषय शिकवले जातात.
