DIPLOMA IN CNC PROGRAMMING IN SATARA

 

(कालावधी एक वर्ष, नोकरी अथवा व्यवसायातुन मिळणारे अंदाजे उत्पन्न  १०००० ते 5०००० )

    सध्याच्या ऑटोमेशनच्या युगात कमी वेळेत ,कमी कष्टामध्ये काम होण्यासाठी इंडस्ट्रीमध्ये पारंपारीक लेथ व मिलिंग मशीन्सच्या जागेवर आधुनिक सी.एन.सी मशीन्सचा वापर मोठया प्रमाणात होत आहे.सी.एन.सी म्हणजे कॉम्प्युटराईज्ड न्युमरीकल कंट्रोल या मशीन्स कॉम्प्युटरदवारे त्यांना दिलेल्या प्रोग्रामनुसार (सुचनांनुसार) नियंत्रित होतात.सी.एन.सी मशीनवर काम करणे एक प्रकारचे स्मार्ट वर्क आहे.सध्याच्या काळात सर्वात जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध असणारे क्षेत्र म्हणून सी.एन.सी कडे पाहिले जाते.याच क्षेत्रामधील कुशल मनुष्यबळाची कमतरता भरूण काढण्यासाठी व जास्तीत जास्त युवकांना रोजगार मिळवुन देण्याच्या हेतुने संस्थेने सी.एन.सी हा कोर्स सुरू केला आहे.

         सी.एन.सी ऑपरेटिंग व प्रोग्रामिंगचे दर्जेदार प्रशिक्षण देण्यासाठी संस्थेने संस्थेमध्येच सी.एन.सी लेथ व व्हि.एम.सी मशीन उपलब्ध केली आहे.या मशीन्सवर विद्यार्थ्यांकडुन जास्तीत जास्त प्रात्यक्षिके करूण घेतली जातात.याबरोबरच ऑडिओ व्हिज्युअल ट्रेनिंगच्या सहाय्याने प्रत्येक विषय समजावुन सांगितला जातो.

         सी.एन.सी वर कामाचा अनुभव मिळावा म्हणुन संस्थेने अनेक कंपन्यांशी ऑन जॉब ट्रेनिंगसाठी करार केलेला आहे.या माध्यमातुन विद्यार्थ्यांना शिकत शिकत काम करण्याची व पैसे कमविण्याची संधी मिळत आहे.

सी.एन.सी ऑपरेटिंग अॅण्ड प्रोग्रामिंग कोर्स करूण विद्यार्थी मासिक १००००रू ते ५००००रू एवढे उत्पन्न कमवु शकतो.

डिप्लोमा इन सी.एन.सी प्रोग्रामिंग.(एक वर्ष)

अ.क्र विषय
सी.एन.सी अॅण्ड व्हि.एम.सी ऑपरेटिंग.
सी.एन.सी अॅण्ड व्हि.एम.सी प्रोग्रामिंग
वर्कशॉप टेकनॉलॉजी
वर्कशॉप मॅनेजमेंट अॅण्ड इंजिनीअरींग ड्रॉईंग
ऑटोकॅड