प्रिय विद्यार्थी मित्रहो,

शिंदे देशमुख टेक्निकल इंस्टीट्युटच्या माध्यमातून गेली सतरा वर्षे तंत्रशिक्षण देताना आम्हाला खर्या अर्थाने आनंद होतो की ज्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून कित्येक बेरोजगार युवकांना हाताला काम मिळाले असून ते विद्यार्थी आज कुटुंबाचे सक्षम आधार बनले आहेत. जीवन जगण्यासाठी जी कौशल्य आवश्यक असतात त्यामध्ये तो युवक व्यवसाय अथवा नोकरीमध्ये स्थिर स्थावर असला पाहिजे. त्याचबरोबर नितीमुल्ये, शिस्त, दृष्टीकोन यांनी जीवन समृद्ध आणि परिपूर्ण बनत असते. त्यामुळे तंत्रशिक्षणाबरोबर सर्वांगीण विकास केंद्राद्वारे आम्ही विद्यार्थ्याची योग्य जडणघडण करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी समजून आदर्श विद्यार्थ्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न करत असतो.

नवनिर्मितीच्या क्षेत्रात म्हणजेच आँटोमोबाईल फँब्रीकेशन कन्सट्क्शन , इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रोनिक्स इ. क्षेत्रामधून समाजाला अत्याधुनिक सुविधा पुरवल्या जातात. श्रम व वेळ वाचवणाऱ्या साधनांची मानवाला नेहमीच ओढ असते. त्यातून माणसांच्या वाढत्या गरजा व त्याला अनुसरून उत्पादन प्रक्रिया या सर्वातील मह्त्वाचा घटक म्हणजे कुशल कामगार होय. वाढते औद्योगिक क्षेत्र वाहनांची वाढती संख्या, धातूंची वाढता वापर, विजेची वाढती मागणी व या क्षेत्रातील वाढता रोजगार या गोष्टी नजरेसमोर ठेऊन संस्थेने वेल्डर, फिटर, इलेक्ट्रीकल, डीजेल मेकानिक, मोटार रिवाईडिंग, CNC इ. कोर्स सुरु केले.

शिक्षण कमी अथवा जास्त असो तंत्र शिक्षणाने बेकार राहण्याची वेळ नक्कीच येत नाही. स्वतःचा व्यवसाय अथवा नोकरी करून बेरोजगारीवर मात करता येते. तसेच आर्थिक दृष्ट्या सक्षम होता येते. नोकरी, व्यवसाय, व्यापार, शिक्षण या सर्वच क्षेत्रात स्पर्धा सुरु असताना जीवन पद्धतीत अमुलाग्र बदल होत असताना रोजगार स्वयंरोजगारासाठी हातामध्ये कौशल्य असणे आवश्यक असते.

कौशल्य प्रशिक्षणाची गरज ओळखून संस्था माफक खर्चामध्ये कौशल्य  आधारित शिक्षण देण्याचे काम करत असून युवकांनी कमी शिक्षणाची खंत मनात न ठेवता किंवा उच्च शिक्षण घेऊन बेकारीला समोर न जाता कौशल्य आधारित प्रशिक्षण घेऊन नोकरी अथवा व्यवसायामध्ये उच्च संधी प्राप्त करू शकतो.

जास्तीत जास्त युवकांनी कौशल्य प्रशिक्षण घेऊन त्यांचे भवितव्य उज्वल करावे यासाठी आमच्या शुभेच्छा

प्राचार्य

शिंदे देशमुख टेक्निकल इंस्टीट्युट