DIESEL MECHANIC: 

(कालावधी १ वर्ष नोकरी अथवा व्यवसायातुन मिळणारे अंदाजे उत्पन्न  १०००० ते ६०००० )

सध्याच्या काळात दळणवळणासाठी वाहनांचा वापर मोठया प्रमाणात वाढला आहे.गाडी हि माणसाची मुलभुत गरज झालेली आहे.हजारो गाडया आपणास रस्त्याने धावताना दिसतात.जेवढया मोठया प्रमाणात वाहनांची गरज वाढतेय तेवढयाच मोठया प्रमाणात वाहनांचे उत्पादन वाढतेय.या वाढत्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रिमध्ये मोठया प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत.याबरोबरच या वाहनांच्या दुरूस्तीसाठी व सर्विसिंगसाठी मोठया प्रमाणात उद्योगाच्या संधी या क्षेत्रात आहेत.

याचाच विचार करूण संस्थेमध्ये डिझेल यांत्रिकी हा कोर्स सुरू केला.या कोर्सच्या माध्यमातुन दरवर्षी ५० ते ६० विद्यार्थी संस्थेमध्ये प्रशिक्षण यशस्वीरीत्या पुर्ण करूण सातारा,शिरवळ,पुणे व बारामती येथे अनेक कंपन्यांमध्ये काम करतात.याबरोबरच काही विद्यार्थी स्वतःचे सर्विसिंग सेंटर,गॅरेज इ उद्योग सुरू करतात.

संस्थेमध्ये या कोर्सचे अतिशय दर्जेदार प्रशिक्षण दिले जाते.मुलांना ऑटोमोबाईल मधील सर्व सिस्टिम्स माहित व्हाव्यात यासाठी ऑडिओ व्हिजुअल पध्दतीने सर्व प्रशिक्षण दिले जाते.व विद्यार्थ्याला परीपुर्ण प्रात्यक्षिक देण्याच्या हेतुने संस्थेमध्ये आवश्यक सर्व इंजिन्स,गिअर बॉकस,टुल्स व इतर सर्व मशिनरीज उपलब्ध करून दिल्या आहेत.याबरोबरच विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीमध्ये चालणारी कार्यप्रणाली माहिती व्हावी यासाठी इंडस्ट्रीयल व्हिजीटस दिल्या जातात.नोकरी मिळणे सोपे जावे यासाठी नोकरीविषयक तज्ञांचे मार्गदर्शन दिले जाते तसेच उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन मिळण्यासाठी उद्योजकता प्रोत्साहन सप्ताह आयोजिय केला जातो.

डिझेल मेकॅनिक हा कोर्स करीअरसाठी अत्यंत उपयोगी कोर्स असुन युवा वर्गाने या क्षेत्रामधील संधीचा फायदा घेउुन आपले करीअर उज्ज्वल करावे या शुभेच्छा.

स्स्थेंतील डिझेल मेकॅनिक हा कोर्स हा ITI समतुल्य असुन यास अॅप्रेंटिसशीप अॅकटनुसार अॅप्रेंटिसशीप लागु आहे.