इलेक्ट्रिशन /ELECTRICIAN
(कालावधी २ वर्ष)
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुम्हाला सध्याच्या काळात करियर साठी महत्वाचा आणि जो कोर्स केल्यानंतर तुम्हाला शासकीय,खाजगी नोकरी तसेच व्यवसायाच्या देखील अनेक संधि उपलब्ध असतील अशा कोर्सबद्दल माहिती सांगणार आहे.हा कोर्स म्हणजेच इलेक्ट्रिशन.
सर्वप्रथम आपण या कोर्सबद्दल माहिती व कोर्सचे महत्व जाणून घेऊया.
तुम्हाला तर माहिती आहेच की, संपूर्ण जग हे विजेवर चाललय. वीज बंद झाल्यास संपूर्ण जगातील कारभार बंद होऊ शकतो. कारण आपल्या घरातील लाइट, होम अॅप्लायन्सेस जसेकी, इस्त्री, फॅन, मिक्सर, वॉशिंग मशीन, गीझर, AC इत्यादि हे सर्व विजेवर चालतात आणि अचानक इलेक्ट्रिसिटी बंद झाल्यास सर्वच कामे थांबतात आणि सर्व जण अतुरतेने इलेक्ट्रिसिटी चालू होण्याची वाट पाहतात.
तसेच इलेक्ट्रिसिटी बंद झाल्यास computer व internet चालणार नाही त्यामुळे बँका,संस्था व इतर ऑफिसेस मधील कामेही थांबतील.तर इंडस्ट्री मध्ये सर्वच मशीन्स विजेवर चालणार्या असल्यामुळे सर्वच इंडस्ट्रीज बंद राहतील व उत्पादन होणार नाही.
येणार्या काळात याच इलेक्ट्रिसिटी चे महत्व वाढणार आहे म्हणजेच पेट्रोल व डिझेल वर चालणार्या असंख्य गाड्याही आता विजेवर चालतील याची सुरुवातही झाली आहे अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक वेहिकल मार्केटमध्ये आणल्या देखील.
म्हणजे नक्कीच इलेक्ट्रिसिटीचे आणि त्यासंबंधी काम करणार्या इलेक्ट्रिशन ज्याला आपण मराठीत विजतंत्री म्हणतो यांना जास्त महत्व आहे.
आता आपण या कोर्सबद्दल म्हणजेच कोर्सचा कालावधी,पात्रता व प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे याबद्दल माहिती घेऊया.
- इलेक्ट्रिशन या कोर्सचा कालावधी दोन वर्षाचा असतो.
- हा कोर्स करण्यासाठी उमेदवार किमान दहावी पास असावा लागतो.
- प्रवेशासाठी उमेदवाराकडे दहावी किंवा यानंतरचे शिक्षण झाल्याचे गुणपत्रक तसेच शाळा सोडल्याचा दाखला,आधार कार्ड व आयडेंटिटी साइज फोटो असणे आवश्यक असते.
महाराष्ट्र शासनाचा इलेक्ट्रिशन कोर्स केल्याचे फायदे काय ते आपण पाहूया.
- दहावीनंतर इलेक्ट्रिशन हा दोन वर्षाचा कोर्स केल्यानंतर उमेदवाराचा ITI देखील पूर्ण होतो त्याचबरोबर बारावी देखील पूर्ण होते व उमेदवार पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेऊ शकतो.
कोर्स पूर्ण केल्यानंतर उमेदवार अॅप्रेंटिस अॅक्ट नुसार अॅप्रेंटिस करू शकतो.
आता आपण जाणून घेऊया इलेक्ट्रिशनचे नक्की काय काम असते?
1) इलेक्ट्रिशन सर्व प्रकारचे घरगुती,इंडस्ट्रियल,आउटडोर वायरिंग करू शकतो.
2) सर्व प्रकारचे इलेक्ट्रिक डोमेस्टिक होम अॅप्लायन्सेस चे इन्स्टोलेशन व रीपेयर करू शकतो.
3) सिंगल फेज, थ्री फेज मोटर, स्टार्टर दुरूस्ती, मोटर Rewinding, तसेच Connection करू शकतो.
4) कंपन्या व कारखान्यांमधील मशीन्सची इन्स्टॉलेशन व इलेक्ट्रिक मेंटेनन्स ची कामे करतो.
5) वीजनिर्मिती व विजवितरण कंपन्यांमध्ये ग्राहकापर्यंत अखंडित विजपुरवठा करण्यासाठी काम करतो.
6) इलेक्ट्रिशन CCTV इंस्टॉलेशन,सोलार सिस्टेम व इन्वर्टर बॅटरी इंस्टॉलेशन चे कामही करू शकतो.
यानंतर पाहूया इलेक्ट्रिशन कोर्स केल्यानंतर किंवा इलेक्ट्रिशन झाल्यानंतर नोकरीच्या संधि कुठे असतात?
- इलेक्ट्रिशन कोर्स झाल्यानंतर उमेदवार वीजनिर्मिती व विजवितरन कंपन्यांमध्ये काम करू शकतो.
- प्रत्येक कंपनीमध्ये इलेक्ट्रिकल मेंटेनन्स विभाग असतो त्यामध्ये इलेक्ट्रिशन म्हणून काम करू शकतो.
- तसेच फाइव स्टार हॉटेल्स,मॉल्स,इत्यादीमध्ये मध्ये इलेक्ट्रिशन च्या जागा भरल्या जातात.
तसेच इलेक्ट्रिशन कोर्स केल्यानंतर व्यवसायाच्या संधि मोठ्या प्रमाणात आहेत त्या कोणत्या ते पाहूयात
- या कोर्स नंतर तुम्ही इलेक्ट्रिकल वायरिंग कॉन्ट्रॅक्टर होऊ शकता.वायरिंग चे कॉंट्रॅक्ट घेऊन इलेक्ट्रिशन महिना 30000 ते 200000 किंवा यापेक्षा जास्त उत्पन्न मिळवू शकतो.
- तुम्ही इलेक्ट्रिकल अॅक्सेसरीज विक्री व दुरूस्ती चे shop सुरू करू शकता व या माध्यमातून लाखो रुपये कमवू शकता.
- तुम्ही विद्युत मंडळाचे अधिकृत कॉन्ट्रॅक्टर म्हणून HT व LT लाईन्स चे काम करू शकता.
- सध्या आपला देश अनेक विद्युत रोषणाईची साधने व इतर इलेक्ट्रिकल साधने चीनमधून इम्पोर्ट करतो भारतीय संनांमध्ये विद्युत रोशनाईला अधिक महत्व आहे त्यामुळे तुम्ही वेगवेगळी Innovative उत्पादने तयार करू शकता ज्यामध्ये लाइट च्या माळा,आकाश कंदील इत्यादीचे उत्पादन करूनही मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवू शकता.
- इलेक्ट्रिक मोटर स्टार्टर इन्स्टोलेशन, मोटर रिवायण्डिंग चाही उद्योग तुम्ही सुरू करू शकता.
- हा कोर्स करण्यासाठी योग्य संस्थेची निवड कशी कराल.
- सर्वप्रथम संस्था महाराष्ट्र शासन (महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मान्यताप्राप्त) असणे गरजेचे आहे.
- संस्थेमध्ये या प्रशिक्षणासाठी आवश्यक यंत्रसामुग्री व साहित्य साधने आहेत का? हे पहावे.
- प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षित व अनुभवी प्रशिक्षक वर्ग आहे का?
- सध्याच्या काळात तंत्रज्ञानामुळे डिजिटल शिक्षण पद्धतीचा वापर केला जातो का?
- प्रशिक्षणाबरोबरच संस्थेमध्ये विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास,रोजगार व स्वयंरोजगारासाठी कोणकोणते उपक्रम राबविले जातात?
या सर्व बाबींचा विचार करून उमेदवाराने संस्थेमध्ये प्रवेश घेणे आवश्यक आहे.
तरी या कोर्सबद्दल अधिक माहिती साठी तुम्ही 9545672112 या नंबरवर संपर्क करू शकता.
